संवेदना… पुंडलिकराव साठे यांना पत्नी शोक

 

मारेगाव येथे होणार दुपारी 12 वाजता अंत्यविधी 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुंडलिकराव साठे यांच्या पत्नी आयुष्यमती रमा पुंडलिकराव साठे (63)यांचे अल्पशा आजाराने गुरुवार रोजी रात्री 8 वाजता निधन झाले.

 

येथील आंबेडकरी चळवळीचे खंदे समर्थक तथा सामाजिक कार्यकर्ते पुंडलिकराव साठे यांच्या पत्नी आयुष्यमती रमा यांच्यात मागील काही दिवसापासून प्रकृतीत बिघाड झाला होता. सातत्याने उपचार सुरु असतांना गुरुवारला सायंकाळी प्रकृती खालावली. तात्काळ वणी हलविले येथून चंद्रपूर खासगी दवाखान्यात डॉक्टरांनी मृत घोषित केले.

 

आज शुक्रवारला दुपारी 12 वाजता स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. मृत रमा हिच्या पश्चात पती , दोन मुलं, दोन मुली असा आप्तपरिवार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment