– संघटन मजबूत करण्यासाठी पायाला भिंगरी
– आगामी निवडणुकीत लागणार कस
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
मारेगाव तालुक्यात शिवसेना पक्षाची मोट बांधण्याचे तगडे आव्हान पेलण्याची जबाबदारी तालुका प्रमुख म्हणून पुरुषोत्तम बुटे तर सचिव म्हणून दिवाकर सातपुते यांचेकडे देण्यात आली आहे.
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होवू घातल्या आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची मोट बांधण्यासाठी पक्षाचे प्रमुख पद आमदार संजय देरकर यांच्या पुढाकारातून बुटे व सातपुते यांचेकडे देण्यात आले.
दोघांची निष्ठावंत शिवसैनिक म्हणून तालुक्यात ओळख अधोरेखित आहे. दिवाकर सातपुते हे मागील 25 वर्षांपासून राजकीय चळवळीत अग्रणी आहे. गावपातळीवरील अनेक समस्यांना त्यांनी वाचा फोडून प्रशासनाकरवी प्रलंबित प्रश्नाचे निरसन केले. नव्हे तर येथील भ्रष्ठाचार चव्हाट्यावर आणून कर्मचाऱ्यास निलंबनाचा रस्ता दाखविला. पारदर्शकतेचे पुढारपण अंगीकारणाऱ्या सकारात्मक व्यक्तिमत्वाची सचिव पदी नियुक्ती सातपुतेच्या रूपात तर अख्खी हयात सच्चा शिवसैनिक म्हणून बुटे यांची तालुका प्रमुख पदीची नियुक्ती संघटन मजबूत व आगामी निवडणुकीत कशी व्युव्हरचना आखतात याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, बुटे आणि सातपुते यांच्या नियुक्तीचे श्रेय आमदार देरकर यांना देतात तर त्यांच्या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत आहे.