मारेगांव: विटा न्युज नेटवर्क 

 

स्थानीक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगांव येथील भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एन. आर. पवार यांची राज्यस्तरीय युवा महोत्सवासाठी परिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे,

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 12 ते 14 डिसेंबर दरम्यान नांदेड येथे होणाऱ्या राज्य स्तरीय युवा महोत्सव साठी त्यांच्याकडे असणाऱ्या कौशल, विविध क्षेत्रांतील ज्ञान आणि त्यांच्या अचिवमेंट्स च्या आधारे त्यांची परीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

 

मारेगाव महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. अविनाश घरडे, संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. नानाजी खंडाळकर, सचिव मा. ॲड. सुधीर दामले, व्यवस्थापक मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्यगण, प्राध्यापक आणि कर्मचारी बंधूंनी त्यांच्या नियुक्तीचे कौतुक आणि अभिनंदन केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment