– सोनूपोड नजीकची घटना
– मृतक महिला मारेगाव ची
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
येथील प्रभाग क्रमांक 11 मधील दाम्पत्य मोटारसायकलने सराटी कडे जात असतांना महिला दुचाकीवरून खाली पडल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारला 12 वाजताचे दरम्यान घडली.
शबाना गफ्फार कुरेशी (45) रा. मारेगाव असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
गफ्फार आणि शबाना हे दोघे पती पत्नी दुचाकीने सराटी गावाकडे जात होते. सराटी अलीकडे सोनू पोड नजीक रस्त्यावर खड्डे चुकवितांना मागे बसलेली महिला अचानक खाली कोसळली. तिच्या डोक्याला जबर मार लागल्याने ती निपचित पडली. तातडीने मारेगाव रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषीत केले.
दरम्यान, मृतक महिलेच्या पश्चात पती, दोन मुले एक मुलगी असा आप्तपरिवार आहे.