– पुस्तके निःशुल्क वाटप करून दिली आदरांजली
. कँडल मार्च आयोजनाने मानवंदना
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
बौध्द स्मारक समिती, चिंचमंडळ द्वारा विश्वरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन पुस्तके निःशुल्क वाटप करून अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.
बौ. स्मा. समिती चे अध्यक्ष आयु. ज्ञानेश्वर देठे, सचिव आयु. राजेश कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत विश्वरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामुहिक बुद्धवंदना घेवून अभिवादन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब एका संदेशात म्हणतात “वाचालं… तर वाचालं..!” बाबासाहेबांच्या या संदेशाचे अनुकरण करण्यास बौ. स्मा. समिती द्वारे महापरिनिर्वाण दिनी खरी आदरांजली देण्याकरीता पुस्तक वाटपाचा उपक्रम राबवून ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ व ‘भारतीय संविधानचे’ आवृत्ती पुस्तक आयु. ज्ञानेश्वर देठे तथा आयु. राजेश कांबळे यांच्या शुभहस्ते उपस्थित नागरिकांना निःशुल्क वितरित करण्यात आले.
सायं. ६:३० वा. कँडल मार्च गावातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करून बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थितीत बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली.