– दारू, गांजाची भल्या पहाटेपासून विक्री : जुगाराचाही बनला अड्डा
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
मारेगाव शहरातील निवडक लेआउट मध्ये देशी विदेशी दारूची अवैधरित्या सह गांजाची विक्री जोमात सुरु आहे. हे पहिल्या टप्प्यातील व्यसन पूर्ण झाल्यानंतर 52 पत्त्याचा जुगाराचा रंगीबेरंगी खेळ रंगतोय.यामुळे अनेकांचे घरे उध्वस्त होण्याच्या मार्गांवर आहे.यावर पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी पुढे सरसावण्याची गरज निर्माण झाली आहे.
मारेगाव शहरात लेआउट सताड आहे. यासोबत विवाहित पुरुषासोबत युवकांचे व्यसनाधिनचे प्रमाण फोफावत असतांना हौशी अवैध व्यवसाईकांनी खुलेआम अवैध व्यवसाय जोमाने सुरु केला आहे.
भल्या पहाटे पासून देशी विदेशी दारूची विक्री सह संभाव्य ग्राहकांना खास मेजवानी म्हणून फिल्टर पाण्यासह ग्राहकांचे चोचले पुरविण्यासाठी चकण्याची व्यवस्था करण्यात येते त्यामुळे येथे व्यसनाधीन लोंढ्यांची लेआउटला भरीव जत्रेचे रूप प्राप्त झाले आहे.
अवैध दारू विक्री सह अफू गांजा चे शौकीन प्रामुख्याने युवा वर्ग सकाळचा क्लास भरवित असते हे व्यसन पूर्ण झाल्यागत 52 पत्त्याचा खेळ तब्बल 12 वाजेपर्यंत रंगतोय. एकूणच घरे नसलेले लेआउट तूर्तास पहाटेपासून अवैध व्यवसाय व आंबट शौकीनांचे माहेरघर बनले असून यावर पोलिसांनी तात्काळ उपाययोजना करून व्यसनाधीन आणि अवैध विक्री करणाऱ्यावर लगाम लावावा अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.