– कॅण्डल मार्च : विविध संघटना, मान्यवर तथा अनुयायांनी केले अभिवादन
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महपरिनिर्वाण दिनी 6 डिसेंबर रोजी येथील पुतळ्याला मेणबत्ती प्रज्वलीत करीत पुष्पहार अर्पण करून शेकडोंनी अभिवादन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासून विविध संघटना, प्रतिष्ठित नागरिक व अनुयायांची रिघ लागली होती.
येथील धम्मराजिका बुद्ध विहारात बुद्ध रुपाला फुलांची उधळण करण्यात येवून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. याप्रसंगी अनेकांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वज्ञानावर प्रकाश टाकला.
सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची कॅण्डल मार्चने शहराच्या विविधांगी मार्गाने अभिवादन रॅली काढण्यात येवून डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ सामूहिक त्रिशरण पंचशील घेवून सांगता करण्यात आली. यावेळी विविध संघटना, मान्यवर, उपासक उपासिकांची उपस्थिती होती.