आज चिचमंडळ येथे सदुचे लग्न

 

– तुफान विनोदी नाटक प्रेक्षकांना पोट धरून हसवणार.

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

एकेकाळी चाळीस वर्ष अवघ्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांना मनमुराद हसविणारे सुप्रसिद्ध नाटक सदूचे लग्न आज चिचंमंडळ येथे रात्री 8 वाजता सादर होणार आहे.

मारेगाव येथील हौशी कलावंतांनी सतत तीन महिने या नाटकासाठी मेहनत घेतली आहे. त्यांचे हे नाटक संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात गाजत आहे. चंद्रपूर येथील राज्य नाट्य स्पर्धेत देखील या नाटकाने मोठी प्रसिद्धी मिळवली आहे.

या नाटकाचा प्रयोग आज बुधवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी चिंचमंडळ येथे रात्री 8 वाजता होणार आहे.

या नाटकामध्ये प्राचार्य हेमंत चौधरी, रमाकांत लखमापूरे, मेहमूद पठाण,अवंतिका मुरस्कार, वैशाली वातीले, समाधान भगत, गुलशेर पठाण, प्रगती मुरस्कार,सुवर्णा नरांजे, विनेश मेश्राम या कलावंतानी भूमिका साकारल्या आहे.

या तुफान विनोदी नाटकाचा प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा व पोट धरून हसण्याचा आनंद घ्यावा असे आवाहन चिंचमंडळ येथील ग्रामवासी यांनी केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment