मारेगावात व्याख्यान… हल्लीच्या काळात लोकशाही लोळण घेते ही शोकांतिका

  – स्वराज्य अकॅडमी वक्ता समीर लेनगुळे यांनी व्यक्त केली खंत

– मारेगावात सम्राट अशोका, म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क

विश्वररत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना येथील व्यवस्था हळुवारपणे दूर सारण्याचा प्रयत्न करते आहे. आता बहुजनांनी वाचन संस्कृतीवर भर देत सजगतेने बाबासाहेबांच्या विचारांचे सरदार संसदेत पाठविण्याची गरज निकडीची झाली आहे. अलीकडच्या धार्मिक व राजकीय चळवळीत लोकशाही लोळण घेत असल्याची खंत स्वराज्य अकॅडमी वक्ता समीर लेनगुळे यांनी व्यक्त केली.

ते मारेगाव येथे आयोजित सम्राट अशोका, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पर्वावर आयोजित 14 एप्रिल रोजी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष डॉ.मनिष मस्की होते. वणी पं.सं. माजी उपसभापती वृषाली खानझोडे, नगरसेविका थारांगना खालिद पटेल, जितेंद्र नगराळे, हेमंत नरांजे, व आयोजन समितीच्या वंदना रायपुरे ह्या विचारमंचावर प्रमुख अतिथी होत्या.

याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक लेनगुळे यांनी बहुजन समाजानी आता समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्यायाची भूमिका प्रदान करणाऱ्या शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, गाडगे महाराज यांचे विचार अंगीकरण्याची गरज निर्माण झाली आहे. तरच बहुजनांची सामाजिक राजकीय चळवळ पुढे सरकेल.थोर पुरुषांच्या विचाराने समाजात नेतृत्व,कर्तृत्व बहाल करते.नव्हेतर सकारात्मक विचाराने जीवनालाही खरा आकार मिळतो. हा आकार लोकशाही जिवंत ठेवण्यात पुरेसा ठरेल असा आशावाद व्यक्त करतांना आजच्या युवकांना उच्चपदस्थ शिखर गाठण्यासाठी बाबासाहेबांच्या विचारांचे अनुकरण करण्यावर व्याख्याते समीर लेनगुळे यांनी भर दिला.

चळवळ गतिमान करण्याची गरज : वृषाली खानझोडे

डॉ. बाबासाहेब यांचे ध्येय चळवळ पुढे नेण्याची होती. मात्र अलीकडच्या काळात भीमा तुझ्या मताचे पाच जन पाहिजे. ते सक्रीय, निःस्वार्थ असले पाहिजे.आपणास जगण्याचा, सन्मानाचा मार्ग संविधानाने दिला.ह्या सार्थकाचे फलीत म्हणून चळवळ गतिमान करण्यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज निर्माण झाल्याची भूमिका वणी पं. स. च्या माजी सभापती वृषाली प्रवीण खानझोडे यांनी प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना विषद केली.

दरम्यान,याप्रसंगी स्पर्धेतील विजेत्यांना मंचावरील पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व आंबेडकरी अनुयायी तर्फे आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक डोहणे, प्रास्ताविक गौरव चिकाटे तर उदय रायपुरे यांनी आभार मानले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment