Breaking News

मनसेच्या महिला तालुकाध्यक्षपदी उज्वला चंदनखेडे

 

 – मारेगाव तालुक्यात सोशल कार्य व दांडगा जनसंपर्कने निवड अधोरेखित

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क

मारेगाव तालुक्यात गेल्या अनेक महिन्यापासून रिक्त असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला तालुकाध्यक्ष म्हणून तालुक्यातील कोथुर्ला येथील सामाजिक चळवळीच्या कार्यकर्त्या उज्वला विकास चंदनखेडे यांची निवड करण्यात आली.

उज्वला चंदनखेडे या सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. तालुक्यातील जनसामान्यांच्या प्रश्नांना न्यायिक भूमिका वटवित बचत गटाच्या माध्यमातून महिलांचा गोतावळा हा त्यांचे मागे विश्वसनीय असतांना याच सकारात्मक कार्याची दखल घेत मनसे चे हे प्रमुख पद बहाल करण्यात आले. एखाद्या राजकीय पक्षाने प्रमुख पदाची जबाबदारी एका दलित महिलेकडे दिल्याचा मारेगाव तालुक्यात बहुदा पहिला प्रसंग मनसे नी येथे अधोरेखित केला.

दरम्यान, मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर यांचे कार्यालयात नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष इर्शाद शेख, जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, महिला जिल्हाध्यक्ष अर्चना बोदाडकर, फाल्गुनी गोहोकार यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.

 

उज्वला चंदनखेडे यांच्या निवडीचे श्रेय त्या पदाधिकारी यांना देतात. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment