– संस्थेने सोडला सुटकेचा निःश्वास
– मारेगाव तालुक्यातील जळका येथील घटना
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
तालुक्यातील जळका येथील आनंद बाल सदनातील 14 वर्षाच्या विद्यार्थ्याने घुमजाव केल्याने संस्थेची पुरती भंबेरी उडाली होती. पोलिसात तक्रार व शोधाशोधित ‘श्लोक’ हा अखेर राळेगाव तालुक्यात गवसल्याने संस्थेने सुटकेचा निःश्वास सोडला.
मारेगाव तालुक्यातील जळका येथील आनंद बाल सदनातील नववी त शिकणारा विद्यार्थी श्लोक विनोद कडुकर याने मागील 13 तारखेला बालगृहातून घुमजाव करीत पोबारा केला होता. अचानक बेपत्ता झाल्याने संस्थेची पुरती भंबेरी उडाली. परिसरात शोधाशोध घेण्यात आला मात्र श्लोक हा कुठेच गवसला नाही. याबाबतची मारेगाव पोलिसात फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
दरम्यान, संस्थेकडून इतरत्र शोध सत्र सुरु असतांना राळेगाव तालुक्यातील खैरी येथे नातेवाईकांना बुधवार ला सायंकाळ च्या सुमारास श्लोक निदर्शनास आला. त्याला विचारपूस केली असता एका विद्यार्थ्यांच्या किरकोळ वादात शाब्दिक बाचाबाचित मी निघून आल्याचे श्लोक ने सांगितले. लगेच त्याला जळका बाल सदनात आणण्यात आल्यागत संस्थेनेही सुटकेचा श्वास सोडला. परिणामी, श्लोक यास मामा अशोक निंबाळकर रा. चिंचमंडळ यांचेकडे स्वाधीन करण्यात आले आहे.