अपघात… अँटो पलटी : मारेगावचा युवक ठार

 

– एक जन जखमी

– कोलगाव मारेगाव रस्त्याने वळणावर अपघात

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

तालुक्यातील कोलगाव येथून अँटो घेवून मारेगाव कडे येत असतांना वळणावर नियंत्रण सुटून पलटी झाल्याने या अपघातात मारेगावचा युवक ठार तर एक जन जखमी झाल्याची घटना आज सोमवार ला दुपारी एक वाजताचे दरम्यान घडली.

 

भावेश विकास केळकर (34)रा. मारेगाव असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव असून दिनेश उईके रा. वडगाव ह. मु. कोलगाव हे गंभीररित्या जखमी झाले आहे.

 

भावेश हा सकाळी अँटोने प्रवासी घेवून गेला होता. परतीच्या प्रवासात अँटो चालवीत सवंगड्या सोबत मारेगाव कडे येते असतांना कोलगाव मारेगाव चे मधात वळणरस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटून अँटो पलटी झाला. यात भावेश ला रस्त्याचा जबर मार आणि अंगावरील वाहनात दबल्या गेल्याने भावेश जागीच गतप्राण झाला.तर दिनेश उईके हा गंभीररित्या जखमी झाला आहे.

 

मृतक भावेश हा भूमिअभिलेख सेवानिवृत्त उप अधिक्षक विकास केळकर यांचे एकुलते एक चिरंजीव होते. भावेश हा वनविभागाची परीक्षा उत्तीर्ण झाला होता.अवघ्या दिवसातच तो वनविभागात रुजू होणार होता मात्र काळाने झडप घातल्याने या दुर्देवी घटनेने मारेगावात शोककळा पसरली आहे.

 

मृतकाच्या पश्चात आई गंगाबाई वडील विकास , पत्नी पिंकी , बहीण संध्या व जावई असा आप्तपरिवार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment