Breaking News

तळीरामांचे मारेगाव हायवेवर लोटांगण

– अनुज्ञप्ती धारकांची सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे डोळेझाक

मारेगाव : दीपक डोहणे

मानवाला व्यसन जडले कि तो सैरभैर होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. यात मारेगाव ही सुटले नसतांना येथे तळीरामांची फौज चक्क हायवेवर लोटांगण घालण्याचे चित्र आज शनिवारला बघावंयास मिळाले. एक नव्हे तर तब्बल चौघे जण नशेतील निद्रावस्थेत रस्त्याच्या कडेला निरव आराम करीत आहे.अनेक पादचारी व दुचाकीस्वार कुतूहल अन हास्यास्पदाणे बघत यात आपला तर नातेवाईक नाही ना ? याचीही चौकशी करीत आहे.

 

मारेगाव तालुकास्थळी देशी विदेशी दारू दुकानाला कमालीचा उत आला आहे. यासोबत व्यसनधिनाचा आलेख वाढला असतांना अनेकांना आजाराने ग्रासले आहे. अनेकजण पाय हासडत आपले व्यसन पूर्ण करण्यासाठी या मंदिरात मदिरेचा आस्वाद घेतात. यामुळे अनेकांचे कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गांवर असल्याचे धक्कादायक प्रकरण समोर येत आहे.

 

परिणामी सर्वोच्च न्यायालयाचे झिन्गलेल्या तळीरामांना घरपोच सोडण्याचे निर्देश येथे केराची टोपली दाखवित आहे. व्यसनाधीन ग्राहकांना परवाना नसतांना वाजवी पेक्षा अधिकची दारू विक्री करणे खरेच नियमात बसतेय का? याचीही खातरजमा होणे गरजेचे आहे. किंबहुना अबकारी विभाग याकडे कुठल्या नजरेने बघतोय हा खरा प्रश्न येथे मात्र घोंगावत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment