Breaking News

सांगता… मारेगाव येथे उद्या वर्षावास समापन सोहळा

भिक्खु संघाची धम्मदेसना

– डॉ.कमलताई रा.सु गवई यांच्या प्रबोधनाची मेजवानी

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

मारेगाव येथील धम्मराजिका बुद्ध विहारात मागील तीन महिन्यापासून सुरू असलेल्या वर्षावास समापन समारोह सोहळा उद्या दि.4 नोव्हेंबर रोजी होणार आहे.दिवसभर चालणाऱ्या कार्यक्रमात भिक्खु संघ व डॉ.कमलताई गवई यांचे धम्म प्रवचन बौद्धीक मेजवानी ठरणार आहे.

 

बौद्ध धम्मात वर्षावासाला आध्यात्मिक मोठं महत्व आहे. जगात गुरुपौर्णिमा अर्थात आषाढी पौर्णिमा आनंद उत्सव म्हणून साजरा केला जातो.तथागत गौतम बुद्धांनी समस्त मानवाला अविद्येच्या अज्ञान अंधकारातून मुक्त करणारे आणि प्रज्ञेच्या प्रकाशात आणणारे ज्ञान पेरले.याच दिवसांपासून बौद्ध धम्मातील पवित्र तीन महिन्याच्या वर्षावासाला मारेगाव धम्माराजिका बुद्ध विहारात प्रारंभ झाला.यात ध्यान साधना , बुद्ध रुपाच नियमित पूजन बुद्ध वंदना , भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे वाचन करण्यात आले.अशुद्ध मनाची शुद्धता करण्याच्या या तीन महिन्यात वर्षावास समापन सोहळा शनिवार रोजी आयोजित आहे.

सकाळी सहा वाजता सुरू होणाऱ्या कार्यक्रमात ध्यानसाधना , बुद्ध रुपाच पूजन , बुद्ध वंदना , धम्म ध्वजारोहण , परित्राण पाठ , भिक्खु संघाच्या भोजनदान नंतर दुसऱ्या सत्रात दुपारी 12 वाजता भदंत सत्यानंद महाथेरो , भदंत राहुल थेरो , भदंत सुभोध थेरो , भदंत विनयवंश लंकाश हे धम्म प्रवचन करणार आहेत.

 

तिसऱ्या सत्रात दुपारी 3 वाजता ‘विपश्यना’ ही काळाची गरज या विषयांवर गव्हर्नर लेडी डॉ.कमलताई गवई हे पुष्प गुंफणार आहे.प्राचार्य संजय तेलतुंमडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे.

 

चौथ्या सत्रात रात्री 8 वाजता सामुहिक भोजनदान असून सदर कार्यक्रमास शुभ्र वस्त्र परिधान करून उपासक उपासीकेंनी हजर राहण्याचे आवाहन धम्मराजिका उपसिका महिला संघानी केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment