Breaking News

खळबळजनक… मारेगाव नगरपंचायतचे लिपिक निलंबित

– कर्तव्यात कसूर करीत असल्याचा ठपका

– प्रभारी मुख्याधिकारी अरुण भगत यांनी केली कारवाई

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

येथील नगरपंचायत प्रशासनातील लिपिक पदावर कार्यरत शेख हबीब शेखलाल शेख यांचेवर सातत्याने कर्तव्यात कसूर करीत असल्याचा ठपका ठेवून निलंबित करण्यात आले.या कारवाईने पुरती खळबळ उडाली असून निष्क्रिय कर्मचाऱ्यात धास्ती निर्माण झाली आहे.

ग्रामपंचायतच्या धर्तीवर ग्रामीण स्थानिक संस्था म्हणून मारेगाव येथे नगरपंचायतची स्थापना शहरी स्थानिक म्हणून करण्यात आली. 

नगरपंचायत स्थापने पासून येथील काही कर्मचारी पुरते सैरभैर झाले होते.त्यातच संबंधित लिपिक हा नियमितपणे कर्तव्यात कसूर करीत कामकाजाकडे कायम दुर्लक्ष करीत असल्याचा ठपका ठेवून प्रभारी मुख्याधिकारी अरुण भगत यांनी सदर लिपिकास निलंबित केले.या कारवाईने निष्क्रिय कर्मचाऱ्यात पुरती दहशत पसरली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment