Breaking News

मारेगाव तालुक्यात खेडा कापूस खरेदीची पहाटेपासून स्पर्धा

– कवडीमोल भावात खरेदीने नागवला जातोय बळीराजा

– आर्थिक लूट थांबवा : अन्यथा ‘मनसे’ स्टाईल आंदोलन

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

तालुक्यात कापूस निघण्याचा हंगाम सुरू झालाय.बाजार समिती अन पोलीस स्टेशन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत भल्या पहाटेपासून शेतकऱ्यांचा माल कवडीमोल भावात गिळंकृत करण्याचा सपाटा व्यापाऱ्यांनी ग्रामिण भागात सुरू केलाय.खेडा खरेदीदारांचे मुसके आवरा अन्यथा मारेगाव शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेना लगाम लावेल असा गर्भित ईशारा देण्यात आला आहे.

 

मारेगाव तालुक्यातील शेती हा मुख्य व्यवसायावर येथील शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन असते.अशातच नैसर्गिक संकट नियमित मागावर असतांना तूर्तास कापूस हंगाम सुरू झालाय.या हंगामावर आता खेडा खरेदीसाठी व्यापाऱ्यांची वक्रदृष्टी आहे.भल्या पहाटे पासून आपले वाहने नेवून तोडक्या दरात कापूस खरेदीला कमालीचा जोर पकडला आहे मात्र यावर नियंत्रण ठेवणारे कृषी उत्पन्न बाजार समिती व पोलीस प्रशासन मूग गिळून शेतकाऱ्यांची आर्थिक लूट जाणीवपूर्वक उघड्या डोळ्यांनी बघत आहे.किंबहूना कृषी प्रधान देशाचा पोशिंदा खेडा खरेदीने पुर्णतः नागविला जात असल्याचा आरोप मारेगाव शहर मनसे अध्यक्ष चांद बहादे यांनी निवेदनातून केला आहे.

 

दरम्यान , तोडक्या दरात कापूस – सोयाबीन खरेदीसाठी खेडा खरेदी जोमात असतांना भल्या पहाटे पासून गाव खेड्यात खरेदीदार घिरट्या घालून शेतकऱ्यांना आर्थिक लुबाडणूक करीत नागविल्या जात असून यावर तात्काळ बंदोबस्त करून कायमस्वरूपी हे लुबाडणूकीचे गोरखधंदे बंद करण्याची तसदी घ्यावी अन्यथा मारेगाव शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईलने वठणीवर आणेल असा गर्भित ईशारा शहर अध्यक्ष चांद बहादे , आकाश खामनकार , गजानन चंदनखेडे , ईशान दारुंडे , जमीर सय्यद यांनी बाजार समिती व पोलिसात दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment