– मारेगाव तालुक्यातील भालेवाडी येथील शारदा ठरत आहे शेतीची ऊर्जास्रोत
मारेगाव : दीपक डोहणे
तालुक्यातील भालेवाडी येथील चौकोनी कुटुंबाचे अल्पभूधारक शेतकरी. महागाईच्या काळात तोडक्या शेतीवर कुटुंबाचा काफीला कसा जगेल ही विवंचना त्यांच्या मागावर.म्हणून मिळेल त्या मोलमजुरीने जायचे प्रसंगी डवरणीच नाही तर फवारणीचा पंप पाठीवर घेवुन पुरुषांच्या बरोबरीत फवारणी करायची.अशा जिद्द व चिकाटीने पुरुष प्रधान संस्कृतीला लाजविणारी भालेवाडी येथील कष्टकरी महिला शारदा रमेश रामपुरे.तिच्या कष्ठाळू अन मेहनत आळशी पुरुषांना चपराक मारत आहे.
महिला आज प्रत्येक क्षेत्रात आपले अस्तित्व यशस्वीपणे सिध्द करित आहे. त्यात शेती क्षेत्र ही मागे नाही.शेतीमध्ये तर महिला सुरुवातीपासूनच पुरुषांच्या बरोबरीने राबतांना आपण पाहतोय.एवढेच नव्हे तर काही महिला शेतीमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर शेतीचे उत्पादन वाढवून यशस्वी शेती करीत आहेत.
तालुक्यातील भालेवाडी येथील रमेश सोबत पत्नी शारदा.त्यांचे दोन कोवळी लेकरं असा चौकोनी कुटुंबाचा काफीला. त्यांचेकडे भालेवाडी शिवारात तिच्या आई कडून मिळालेली 4 एकर खडतर शेतजमीन. नैसर्गिक संकटात तोडके उत्पादन होईल त्यावर दिसं काढत गुजरान करायची.मात्र महागाईचा भस्मासुर मानगुटीवर असल्याने मिळेल तिथे जाऊन मजुरी करायची.केवळ निंदनच नाही तर डवरणी करायची नव्हेतर फवारणीचा पंप पाठीवर घेत फवारणीही करायची आणि कुटुंबाचा आर्थिक आधारवड बनत शारदाबाई कष्टकरीचा प्रत्यय देत आहे.
पुरुष प्रधान संस्कृतीत आज महिला सुध्दा मागे नाही. मात्र बांधावरचीच नाही तर ढेकळातील अस्सल शेतकरी व शेतमजूर म्हणून शारदाबाई इतरांच्या मजुरीने जात पाठीवर पंप घेते आहे. मारेगाव तालुक्यात बहुदा ही कष्टकरी शेतमजूर महिला पहिलीच असल्याने पुरुष मजुरांना लाजविणारी कष्टकरी महिला सॅल्यूट साठी पुरेशी ठरत आहे.
विशेष म्हणजे , हे रामपुरे कुटुंब शेतशिवारातच चंद्रमौळी झोपडीत गुजराण करीत शेती सांभाळताहेत. एव्हाना मिळेल त्यांच्या फवारणी , डवरणी व इतर शेतातील कामे शारदाबाई करीत कुटुंबाचा काहीसा आर्थिक आधारवड बनत जिंदगी समोर सरकवायची असे हे तिचे बोलके शब्द आळशी पुरुषांना जबर चपराक व कुटुंबांसाठी ऊर्जा निर्माण करणारे आहे.
शारदाबाई सारख्या प्रत्येक महिला वेगवेगळ्या क्षेत्रात आल्या तर आर्थिक उन्नतीचा परिपाक ठरण्यास बळ मिळेल.शारदाबाईची कठोर मेहनत , मिळेल ते काम करण्यास तिचे कष्ट इतरांसाठी प्रेरणादायक आहे.
–मारोती गौरकार
शेतकरी, पिसगाव ता. मारेगाव