Breaking News

दोन दुचाकीची समोरासमोर धडक.. मदनापूरचा युवक ठार : दोन जखमी

– मांगरूळ जवळील रात्रीची घटना

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

समोरसमोरून येत असलेल्या दोन दुचाकीचे नियंत्रण सुटून एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू तर दोघे जखमी झाल्याची घटना गुरुवारला रात्री आठ वाजताचे दरम्यान घडली.

 

मारेगाव तालुक्यातील मदनापूर येथील युवक हितेश संजय पारखी (25) हा वणी वरून दुचाकीने मारेगाव कडे येत असतांना मारेगाव येथून मांगरुळ येथील राघो कोरझरे व मोहन मजगवळी हे विरुद्ध दिशेने स्वगावी जात होते.दोघांच्याही दुचाकीचे नियंत्रण सुटून एकमेकास जबर धडक दिली यात हितेश पारखी याचा जागीच मृत्यू झाला.तर मांगरूळ येथील दोघेही गंभीररीत्या जखमी झाले.

 

जखमींना पुढील उपचारार्थ हलविण्यात आले असून या दुर्देवी घटनेने मदनापूर येथे शोककळा पसरली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment