Breaking News

मारेगाव रुग्णालयाची टोलेजंग इमारत दाखविते वाकुल्या

– ग्रामीण रुग्णालयाला लागले रिक्त पदाचे ग्रहण 

– वैद्यकीय अधिकाऱ्यासह १६ पदे रिक्त

मारेगाव : कैलास ठेंगणे

केवळ शेती व्यवसाय असलेल्या तालुक्यातील गरीब जनतेला योग्य दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती केली. मात्र येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यापासून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यापर्यंत तब्बल १६ पदे रिक्त आहे. त्यामुळे नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यावर अतिरिक्त कामाचा बोजा पडते आहे.

 

मारेगाव तालुक्यातील जनतेच्या आरोग्य सुदृढ रहावे याकरिता राज्य सरकारने शहराच्या मध्यवर्ती भागात ग्रामीण रुग्णालयाची टोलेजंग इमारत उभारली. मात्र तालुकावासीयांचे आरोग्य संपन्न होईल हा समज औटघटकेचा ठरतो आहे.

 

स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दररोज शहरी व ग्रामीण भागातील गरीब व गरजू रुग्ण उपचारासाठी येतात. परंतु रुग्णालयात सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची पदे अनेक वर्षापासून रिक्त आहे. रुग्णालयात दररोज शंभर ते दीडशे रुग्णांची नोंद होत आहे. एकट्या वैद्यकीय अधीक्षकाच्या भरोशावर रुग्णालयाचा गाडा हाकला जात आहे. त्यामुळे रुग्णांवर निदान व उपचार करतांना वैद्यकीय अधिक्षकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

 

या रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची तिन पदे, दंत शल्य चिकित्सक एक, अधिपरिचारिका तीन , प्रयोगशाळा तज्ञ एक, सहाय्यक अधिकारी एक, कनिष्ठ लिपिक एक, प्रयोगशाळा सहाय्यक एक, कक्षसेवक तीन, दंत सहाय्यक एक अशी एकूण १६ पदे रिक्त आहेत सुसज्जय इमारत , खाटाची सोय, पिण्याचे पाणी, स्वच्छ परिसर असतानाही रुग्णांचे हाल होत आहे. त्यामुळे या गंभीर बाबीकडे जिल्हा शल्य चिकित्सकांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

 

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

ग्रामीण रुग्णालयातील सोळा पदे रिक्त असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. तरीसुद्धा स्थानिक पुढाऱ्यांना याचे काही सोयरसुतक दिसत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.

 

ग्रामीण रुग्णालयामध्ये एका महिन्यातच वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्यात येईल. इतर पदे लवकरात लवकर भरण्यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. 

-मा.संजीवरेड्डी बोदकुलवार

    आमदार णी विधानसभा क्षेत्र

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment