Breaking News

भारत विद्या मंदिरच्या खेळाडूची गरुड झेप

राज्यस्तरीय शूटिंग बाल स्पर्धा

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क 

तालुक्यातील कुंभा येथील भारत विद्या मंदिरच्या शूटिंग बाल टीमने गरुड झेप घेत विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे सदर टीम जिल्ह्याचे नेतृत्व करीत मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये खेळणार आहे.

ग्रामीण भागातील शाळेची टीम प्रथमच राज्यस्तरीय स्पर्धा खेळणार असल्याने ग्रामीण क्रीडा प्रेमी सह जिल्हास्तरावर सदर टीमचे कौतुक केले.

महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभाग द्वारा द्वारा विभागीय स्तरीय सामने नुकतेच बुलढाणा येथे संपन्न झाले .

स्पर्धेमध्ये भारत विद्या मंदिरची 17 वर्षीय शूटिंग बाल टीमने जिल्ह्याचे नेतृत्व करीत सहभाग नोंदविला. या टीममध्ये रणजीत वर्मा,तेजस चौधरी, प्रथमेश चव्हाण, रोहन राठोड, विशाल शेंडे, कोणीक फटाले, जयंत खंडरे, गौरव चांदेकर, नंदकिशोर ठाकरे, ओम खांडरे ह्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सदर टीमने वाशिम संघाला हरवित करीत प्रथम क्रमांक पटकावला.

त्यामुळे सदर टीम मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धा खेळण्यास पात्र ठरली आहे. त्यामुळे सदर टीमचे जिल्हा क्रीडा अधिकारी, संस्थेचे अध्यक्ष नानाजी खंडाळकर, सचिव ग. पिंपळकर, शाळेचे मुख्याध्यापक संजय देवाळकर, पर्यवेक्षक शेखर सोयाम यांनी खेळाडूंचे कौतुक केले. सदर खेळाडूंना शाळेचे प्रशिक्षक धनराज ठेपाले, सहाय्यक प्रशिक्षक प्रकाश

कुटेमाटे यांनी मार्गदर्शन केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment