Breaking News

सात ग्रा.पं. सदस्यांचा वर्षभरापासून अघोषित बहिष्कार… चिंचमंडळ येथे दोघेच हाकतो कारभार

– सातत्य अन स्थिरता हरपली

मारेगाव : दीपक डोहणे

तालुक्यातील चिंचमंडळ येथील नऊ सदस्यीय ग्रामपंचायत तुर्तास चर्चेत आहे.तिघांच्या हेकेखोर प्रवृत्तीने तब्बल वर्षभरापासून सात सदस्यांनी अघोषित बहिष्कार टाकत बारा मासिक मिटिंग ला गैरहजर असल्याने प्रशासनासमोर ‘कारवाईचा’ पेच निर्माण झाला आहे.

छोट्या ग्राम खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था चालविते.ग्रामसेवक यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो.पंचायतराज च्या सर्वात खालच्या टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात मात्र येथील ग्रामपंचायत चर्चेचा विषय ठरत आहे.

सचिव आणि सरपंच उपसरपंच यांची हेखेखोर प्रवृत्ती ग्राम विकासाची खिल्ली उडवित असल्याचा सात सदस्यांचा आरोप आहे.विविध शासकीय योजनेच्या कामात मुजोरी , बिरागरीतील कंत्राट व ओबडधोबड विकास नावाने होत असलेल्या उधळपट्टीने गावात कारभाऱ्या विरोधात संतापाची लाट आहे.किंबहुना तुघलगी कारभाराचा परिपाक म्हणून सात सदस्यांची गेल्या वर्षभरापासूनची मासिक मिटिंगच्या अनुपस्थितीने प्रशासनात पेच निर्माण होवून बिडीओ च्या दालनात ही तक्रार खितपत पडली आहे.

विविधांगी भ्रष्टाचाराचे आरोप करीत सात सदस्यांनी यापूर्वी थेट मारेगाव पं.स.समोर आंदोलन छेडले होते मात्र ‘व्यवस्थेने’ हे प्रकरण लालफितीत अडकविल्याने प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उठत आहे.

परिणामी , तुघलकी कारभाराचा परिपाक म्हणून येथील ग्रामपंचायतचे सातत्य अन स्थिरता हरविली असून एका वर्षांपासून ची सात सदस्यांची मासिक मिटिंगला गैरहजेरी ईनमिनतीन जनातील ग्रामपंचायत चा कारभार मारेगाव तालुक्यातील इतिहासात चर्चेचा विषय असून कोणावर कशी कारवाई करावी या कात्रीत प्रशासन सापडले आहे.

 

नियम , अटी आणि कायद्याच्या चाकोरीतून किमान सहा मासिक मिटिंग ला सदस्य गैरहजर असेल तर त्यांचे पद रद्द होतात.ग्रा.पं. च्या विविधांगी आंदोलनासह तक्रारीची गांभीर्याने दखल घेत प्रशासकीय स्तरावरील चौकशी सुरू आहे.याबाबतचा अहवाल प्राप्त होताच कारवाई ची दिशा ठरेल.

            –पी.एम.मडावी

गटविकास अधिकारी पंचायत समिती , मारेगाव

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment