Breaking News

शवविच्छेदना नंतर तब्बल तीन तासांनी मृतदेह हलविला

– दोन दिवसात संशायितांना अटक करण्याचे आश्वासनाने तणावपूर्व परिस्थिती निवळली

– करणवाडी व्यवस्थापक आत्महत्या प्रकरण

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

करणवाडी आत्महत्या प्रकरण संवेदनशील बनत मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांनी संशायित आरोपींना अटक करण्याची मागणी करीत रुग्णालयात तणावसदृष्य परिस्थिती निर्माण झाली.नातेवाईक व पोलीस प्रशासनाच्या चर्चेत तब्बल तीन तासानंतर शवविच्छेदन मृतदेह मूळ गावी हलविला.

 

केशव नागरी पतसंस्था शाखा पांढरकवडा येथील लक्ष्मण सिदूरकर व्यवस्थापकाने करणवाडी स्थित आत्महत्या केल्याने सुसाईड नोट व मृतकाच्या पत्नीने फिर्याद नोंदवीत शाखा अध्यक्ष चंद्रशेखर खोंड , सचिव अनिल आक्केवार व कार्यकारी अधिकारी दीपक दीकुंडवार यांचेवर संगनमत करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले.तूर्तास हे तिघेही पसार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

 

परिणामी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव रुग्णालयात आणल्यानंतर नातेवाईकांनी संशायित आरोपींना अटक करण्याची मागणी लावून धरली.अटक होईस्तोवर मृतदेह हलविणार नसल्याची भूमिका घेतल्याने काही काळ तणावसदृश परिस्थिती रुग्णालयात निर्माण झाल्याने तांत्रिक पेच निर्माण झाला होता.

 

पोलीस प्रशासनाने दोन दिवसात अटक करण्याचे आश्वासन दिल्याने तणाव काहीसा निवळला.तब्बल शवविच्छेदनाच्या तीन तासानंतर मृतदेह करणवाडी येथे हलविला.येथे सायंकाळी 4 वाजताचे चे सुमारास लक्ष्मण यांचेवर शेकडो नागरिकांनी जड अंतःकरणाने अखेरचा निरोप दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment