Breaking News

करणवाडी आत्महत्येची धग पेटली… वणी पतसंस्थेचे अध्यक्ष – सचिव व कार्यकारी अधिकाऱ्या विरोधात गुन्हे दाखल

– मृत व्यवस्थापकाच्या पत्नीने दिली मारेगाव पोलिसात तक्रार

– तिघांना अटक करा अन्यथा मृतदेह हलविणार नाही : नातेवाईकांचा गर्भित इशारा

मारेगाव : दीपक डोहणे

वणी केशव नागरी पतसंस्थेच्या तीन पदाधिकारी यांच्या नाहक त्रासाला कंटाळून माझ्या पतीने आत्महत्या केली.यास जबाबदार असणाऱ्या पतसंस्थेच्या तिघांवर संगनमत करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.मृत व्यवस्थापक लक्ष्मण सिदूरकर यांची पत्नी रुपाली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली.दोषींना तात्काळ अटक करा अन्यथा मृतदेह हलविण्यात येणार नसल्याचा गर्भित ईशारा नातेवाईकांनी दिला.

 

मारेगाव तालुक्यातील करणवाडी येथील लक्ष्मण रामचंद्र सिदूरकर हे पांढरकवडा येथील केशव नागरी पतसंस्थेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते.मात्र त्यांचे लिपिक पदावर डीमोशन करीत संस्थेने आदेश निर्गमित केले आणि आर्णी येथे बदली केली.याबाबत लक्ष्मण यांच्या नातेवाईकांनी आई वडिलांचे आजारपण सांगत संस्थेला वारंवार विनंती केली मात्र उलटपक्षी हा प्रकार थांबविण्यासाठी तब्बल 7 लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचे पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.परिणामी लक्ष्मण यांच्या मोबाईल मधील सर्व डेटा डिलीट करण्याची कसरही तिघांनी सोडली नसल्याचा आरोप आहे.

 

दरम्यान या नाहक मानसिक व आर्थिक त्रासाला कंटाळून लक्ष्मण यांनी करणवाडी स्थित विहिरीत गुरुवार ला सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली.या घटनेने पतसंस्थेच्या बेताल भूमिकेने सर्वत्र संतापाची लाट उसळत आहे.

पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पतसंस्थेचे शाखा अध्यक्ष चंद्रशेखर खोंड , सचिव अनिल आक्केवार , कार्यकारी अधिकारी दीपक दीकुंडवार तिघेही रा.वणी यांचेवर संगनमत करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे कलम 306 ,34 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

 

संशायितांना तात्काळ अटक करा अन्यथा मृतदेह हलविणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली असून हे प्रकरण कोणते वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment