Breaking News

गोठ्याला आग लागून दोन लाखाचे नुकसान

– मोटारसायकल , शेतीपयोगी साहित्य , सोपासेट जळून खाक

-मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील घटना

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क 

तालुक्यातील वेगाव येथील गोठ्याला आग लागून शेतीपयोगी साहित्य , मोटारसायकल जळून खाक होवून एक पशुधन गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.यात पिडीत शेतकऱ्याचे किमान दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

वेगाव येथील उमेश कापसे यांचे घरा लगत पशुधन गोठा आहे.गोठ्यात वैरण , शेतीपयोगी साहित्य, पशुधन व मोटारसायकल असतांना मध्यरात्री अचानक आग लागली.आगीने गोठ्यातील सर्व साहित्य कवेत घेत आग घरात गेली काही कळण्यापूर्वीच घरातील सोफासेट जळून खाक झाला.आगीचे लोण पसरत असतांना पशुधनाची सुटका झाली मात्र एक कालवड गंभीररीत्या भाजल्या गेली.

 

दरम्यान , अचानक लागलेल्या आगीने ग्रामपंचायत सदस्य उमेश कापसे या पिडीत शेतकऱ्याचे दोन लाखाचे नुकसान झाले असून प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई प्रदान करावी अशी आर्जव मागणी करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment