Breaking News

आत्महत्येची धग… व्यवस्थापकाचा मृतदेह तुडुंब भरलेल्या विहिरीत अडकला

– सुसाईड नोट ने होणार “आत्महत्येचा” उलगडा

– मारेगाव तालुक्यातील करणवाडी विहिरीत घेतली उडी 

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

तालुक्यातील मूळ गाव असलेल्या करणवाडी व मारेगाव येथे वास्तव्यास असलेल्या आणि पांढरकवडा पतसंस्थेत कार्यरत चाळीस वर्षीय व्यवस्थापकाने करणवाडी येथील विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना सायंकाळी 4 वाजताचे दरम्यान घडली.आत्महत्या पूर्व सुसाईड नोट पोलिसांनी हस्तगत केल्याने आत्महत्येचा उलगडा होणार आहे.मृतदेह काढण्यात प्रचंड अडथळा निर्माण होत शर्तीचे प्रयत्न सुरू आहे.परिणामी या दुर्देवी घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

 

लक्ष्मण रामचंद्र शिदूरकर असे विहिरीत उडी घेवून जीवनयात्रा संपविलेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे.

 

ते प्रारंभी वणी येथील एका पतसंस्थेत लिपिक पदावर कार्यरत होते. त्यांची पांढरकवडा येथे बढती होत व्यवस्थापक पदावर कार्यरत होते.मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांचे डीमोशन करीत त्यांची बदली आर्णी येथे करण्यात आल्याने ते कमालीचे अस्वस्थ असल्याची माहिती वडिलांनी दिली.याच अस्वस्थतेत लक्ष्मण यांनी काही दिवसांपूर्वी पांढरकवडा येथे आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

दरम्यान , गावाशेजारी असलेल्या विहिरीजवळ सायंकाळी 4 वाजता त्याची चप्पल व शर्ट आढळल्याने आत्महत्येचा कयास व्यक्त केल्या जात होता.तत्पूर्वी त्यांच्या घरातील तपासात मृतकाच्या वडिलांनी ‘सुसाईड नोट’ पोलिसांच्या स्वाधीन केली.यात नेमकं कुणावर दोषारोप आहेत ? यावरूनच आत्महत्येचा निकष आणि उलगडा होणार आहे.

 

परिणामी , 60 फुटाच्या पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरी शेजारी बघ्यांची तोबा गर्दी आहे. गळाने मृतदेह काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहे. तब्बल दोनदा मृतदेह गळाला लागून निसटल्याने प्रचंड अडथळा निर्माण होत आहे.घटनास्थळी नातेवाईक व निकटवर्तीयांचा हंबरडा कायम आहे.मृतकाच्या पत्नीची प्रकृती खालावल्याने तिला मारेगाव रुग्णालयात हलविण्यात आले. मृतक लक्ष्मण यांच्या पश्चात वार्धक्यात असलेले आईवडील , पत्नी रुपाली व युवराज आणि ओम अशी कोवळी बालके आहे.या घटनेने पुरती शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment