Breaking News

व्यसनाधिनतेने आर्थिक – सामाजिक घटकाचे नुकसान चिंतनीय : अमीर देसाई 

– मारेगाव वरिष्ठ महाविद्यालयात ‘व्यसनमुक्ती’ वर मार्गदर्शन

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

स्थानिक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व यवतमाळ जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्तीपर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारला महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये करण्यात आले.

सदर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, पुणे येथील श्री. अमीर देसाई तर प्रमुख अतिथी म्हणून मारेगाव पोलीस स्टेशन येथील ठाणेदार श्री. जनार्दन खंडारे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. हेमंत चौधरी व अध्यक्ष म्हणून वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सर प्रामुख्याने उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे यांनी ‘व्यसन दूर करणे कठीण आहे’, ही पराभूत मानसिकता झुगारून द्या आणि ‘व्यसनाच्या विचारांशी लढून व्यसनरूपी शत्रूला ठार मारायचे आहे’, ही विजिगिषू वृत्ती अंगी बाणवा ! मनाला खंबीर बनवण्यासाठी नियमित ‘प्राणायम व योग ’ करावे असे अवाहन केले.

 मार्गदर्शक म्हणून उपस्थित श्री. अमीर देसाई यांनी व्यसनामुळे होणारे वाईट परिणाम व व्यसनातून मुक्त होण्यासाठी चे उपाय विद्यार्थ्यांना तसेच विविध गावातून आलेल्या नागरिकांना सांगितले. तसेच ठाणेदार जनार्दन खंडारे यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी व्यसनाच्या आहारी न जाता सर्वप्रथम आपल्या करिअर कडे लक्ष केंद्रीत केल पाहिजे असे आपले मत व्यक्त केले. 

     कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. हेमंत चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रम यवतमाळचे पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड सर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सर यांच्या मार्गदर्शनातून घेण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रमाधिकारी व राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment