Breaking News

गोंडबुरांडा आशा वर्कर निवड प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात… प्रशासनाचे लेखी आश्वासन : उपोषणाची सांगता

-मारेगावात दोन दिवस आंदोलन पेटले

– संवैधानिक हक्क हिरावल्यास खपवून घेणार नाही : गीत घोष

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

पेसा अंतर्गत गावात आदिवासींना शासकीय योजनेत जाणीवपूर्वक बेदखल करण्याचा घाट खपवून घेणार नाही.तालुक्यातील गोंडबुरांडा येथे ग्रामसभा न घेता गैरआदिवासी आशा सेविकेची निवड करण्याच्या हालचाली त्यातील षडयंत्र असून प्रशासनाचे तकलादू धोरण कारणीभूत असल्याचा घणाघात संवैधानिक परिषदेचे अध्यक्ष गीत घोष यांनी केला.दरम्यान , या विरोधात दोन दिवसाच्या आमरण उपोषणाची दखल घेत प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली.

 मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा या पेसा अंतर्गत गावात आशा वर्कर ची निवड करण्यासाठी ग्रामसभा न घेता व थेट कागदोपत्री ठराव घेत गैरआदिवासीची निवड प्रक्रियेच्या हालचालीला प्रशासनाकडून कमालीचा वेग आला होता.याची कुणकुण लागताच आदिवासी समाजाने तक्रारीचा ढीग प्रशासनाकडे जमा केला.मात्र या तक्रारीला केराची टोपली दाखविल्याचा येथील नागरिकांनी आरोप करीत थेट आमरण उपोषणाचा एल्गार पुकारला.

सलग दोन दिवस चाललेल्या आंदोलनात पेसा अंतर्गत गावातील समाजावर होत असलेल्या अन्यायाचा पाढाच आंदोलनकर्त्यांकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांना वाचवून दाखविण्यात आला.गटविकास अधिकारी मडावी , तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अर्चना देठे , माजी जिल्हा परिषद सभापती अरुणा खंडाळकर यांच्यासोबत गीत घोष ,माजी जिप. सदस्य सुनील गेडाम , प्रवीणा आत्राम , सुमित गेडाम , अर्जुन आत्राम , सागर आत्राम , बाली आत्राम आदींनी सांगोपांग चर्चा करीत लेखी आश्वासनात आशा वर्कर निवडीची सखोल चौकशी करून दोषी सचिवाविरुद्ध नियमानुसार कारवाई करून आठवड्याभरात अहवाल देण्याचे अभिवचन लेखीस्वरूपात देण्यात येवून उपोषणाची सांगता करण्यात आली.परिणामी, कायद्याच्या चाकोरीतून पारदर्शक निर्णयाचा अंमल न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्यात ईशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिल्याने या निर्णयाककडे सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment