– कुंभा येथील घटनेने हळहळ
– सकाळी आला निदर्शनास मृतदेह
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
तालुक्यातील कुंभा येथील विवाहित महिलेने टाकळी शिवारात असलेल्या शेतातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना आज सोमवारला सकाळी दहा वाजता उघडकीस आली.या दुर्देवी घटनेने कुंभा येथे हळहळ व्यक्त होत आहे.
प्रतिभा गणपत मोहूर्ले (40) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.रविवार च्या रात्री कुटुंब झोपी गेले असता एक वर्षीय मुलगा जागा होत रडू लागला.मात्र आई दिसेनासी झाल्याने बाळाने हंबरडा फोडला. अशातच कुटुंबातील सदस्यांनी शोधाशोध घेतली मात्र रात्रभर प्रतिभाचा थांगपत्ता लागला नाही.
दरम्यान , मोहूर्ले कुटुंबाचे शेत लगतच्या टाकळी शिवारात आहे.येथील शेतातील विहीरीत प्रतिभाने रात्री उडी घेत जीवनयात्रा संपविली.आज सकाळी शोध घेतला असता तिचा मृतदेह विहिरीत तरंगत असल्याने आत्महत्येची बाब उघडकीस आली.परिणामी , सदर आत्महत्याग्रस्त महिला ही मानसिक आजाराने ग्रस्त असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली.
मृतक प्रतिभाच्या पश्चात पती , एक वर्षाचा मुलगा , चार वर्षाची मुलगी , सासू – सासरे असा आप्तपरिवार आहे.घटनेचा तपास बिट जमादार राजू टेकाम करीत आहे.