Breaking News

कुंभा शाळेची टीम विभागीय स्तरावर

– विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक

मारेगाव : विदर्भ न्यूज नेटवर्क 

तालुक्यातील कुंभा येथील भारत विद्या मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये शूटिंग बॉलमध्ये प्रथम क्रमांक पटकावित विभागीय स्तरावर टीमची निवड करण्यात आली आहे. सदर टीम 18 ऑक्टोबर रोजी विभागीय स्तरावर खेळणार आहे. या खेळाडूंचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत यवतमाळ मध्ये जिल्हा क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये शूटिंग बाल मध्ये टीमने दमदार कामगिरी केली. या टीम मध्ये तेजस चौधरी, प्रथमेश चव्हाण, रोहन राठोड, विशाल शेंडे, कोणीक फटाले, जयंत खंडरे, गौरव चांदेकर, नंदकिशोर ठाकरे, ओम खांडरे ह्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सदर टीम विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी पात्र झाल्याने शाळेचे मुख्याध्यापक संजय देवाळकर पर्यवेक्षक सोयाम प्रशिक्षक धनराज ठेपाले यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment