Breaking News

ब्रेकींग…. मारेगाव तालुक्यात तीन वाळू तस्करांच्या आवळल्या मुसक्या

– तहसीलदार निलावाड यांची तीन ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई

– चिंचमंडळ शिवारात मध्यरात्री छापा

मारेगाव : दीपक डोहणे

तालुक्यातील मार्डी परिसरातील वाळू तस्करीचा उच्छाद मांडलेल्या चिंचमंडळ येथील ट्रॅक्टर वाहनासह तीन तस्करांच्या मारेगाव तहसीलदार उत्तम निलावाड यांनी मुसक्या आवळत वाळू भरलेले तीन ट्रॅक्टर जप्त केले.ही कारवाई आज शनिवारला मध्यरात्री 2 वाजताचे सुमारास केल्याने परिसरातील तस्करांचे पुरते धाबे दणाणले आहे.

 

कोसारा घाटावरील वाळू तस्करी हा पाठशिवणीचा खेळ नित्याचाच आहे.यात चिंचमंडळ सह दापोरा , कोथुर्ला , खैरगाव राळेगाव तालुक्यातील खैरी येथील वाळू तस्कर नियमित आपला रात्रीचा डाव चालवित शासनाच्या महसूलला लाखो रुपयांचा चुना लावण्याचा गोरखधंदा सर्वश्रुत आहे.मात्र कारवाईचा फास आवळण्यात प्रशासन नापास होतांना दिसत होते.दरम्यान तस्करांचा पर्दाफाश करण्यासाठी प्रशासकीय सेवेतील पारदर्शक अधिकारी तहसीलदार उत्तम निलावाड यांनी रात्रीचा खेळ उध्वस्त करण्यासाठी व्युव्हरचना आखत मध्यरात्री 2 वाजता वाळू भरलेले तीन ट्रॅक्टरवर कारवाईचा फास आवळत जप्त केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

 

दरम्यान , तालुक्यात वाळू तस्करीचा बोलबाला असलेल्या परिसरातील तस्करांना लगाम लावण्यासाठी महसूल विभाग अँक्शन मोड वर येवून तहसीलदार सह पथकाने किर्रर्र अंधारात रात्रभर शिवारात ठाण मांडत चिंचमंडळ येथील वाळू भरलेले तीन ट्रॅक्टरवर छापा टाकून शुभम भास्कर पालकर , वैभव भास्कर सोनटक्के , अनिकेत कमलाकर झाडे यांचे वाहन जप्त केले.

 

तहसीलदार निलावाड यांच्या पारदर्शक भूमिकेने तालुक्यात बहुदा पहिल्यांदाच एखाद्या अधिकाऱ्याने वाळू तस्करांवर थेट आणि प्रत्यक्ष कारवाईचा बडगा उगारल्याने चांगलाच चाप बसणार आहे.शासना कडून रेती घाट उपसा व लिलाव प्रक्रीयेला तूर्तास फुलस्टॉप असतांना तस्करांचे चांगलेच फावत आहे.तहसीलदार यांच्या धडाकेबाज कारवाईने तस्करांनी चांगलाच धसका घेतला असून आपण कारवाईचा रेशो कायम ठेवून तस्करांवर लगाम लावण्याचा आशावाद तहसीलदार उत्तम निलावाड यांनी ” विदर्भ टाईम्स ” शी बोलतांना व्यक्त केला.

दोन ट्रॅक्टर पसार करण्यात चालक यशस्वी

वाळू तस्करांचा समूह या व्यवसायात तरबेज असतांना कोसारा घाटातून चोरीची वाळू घेवून चिंचमंडळ येथील तब्बल पाच वाळू भरलेले ट्रॅक्टर तस्कर आपल्या दिशेने निघाले.दबा धरून असलेले तहसीलदार व पथकाने छापा टाकताच यात तीन वाहने अडकले.यातील दोघे ट्रॅक्टर चालक वाहने घेवून पसार होण्यात यशस्वी ठरले.विशेष म्हणजे तीन जप्ती केलेल्या वाहनात एक ट्रॅक्टर सह मालक दुसऱ्यांदा तस्करी करतांना अलगद अडकल्याने यातून ‘तरबेज’ ची बाब अधोरेखित झाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment