– आत्महत्ये युवा शेतकऱ्याच्या टोकाच्या पावलाने आपटी येथे हळहळ
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
प्रतिभा अन मोहन यांच्या आयुष्याचा आधारवड ‘प्रज्वल’..त्याला कोमल नामक बहीण..दोन्ही भावंड उच्च शिक्षणास अनुक्रमे वरोरा व वणी येथे पदवीचे शिक्षण घेत प्रज्वल शेती ही सांभाळायचा..आज गुरुवार त्याच्या मनात अघटीत आले..अन दुपारी राहत्या घरात थेट गळफास घेत इहलोकाची यात्रा केली..वडील अर्धांगवायुने ग्रासलेले..आई शेती सांभाळत मुलांच्या शिक्षणासाठी राब राब राबायची..मुलगाच आपल्या उर्वरित आयुष्याचा आधारवड म्हणत मायबापाचे स्वप्न क्षणार्धात थिटे झाले..आईवडीलासह बहीण हंबरडा फोडत केवळ शून्यात बघत आहे..गावात प्रज्वल च्या टोकाच्या निर्णयाने हळहळ व्यक्त होत आहे.
मारेगाव तालुक्यातील आपटी येथील वीस वर्षीय वर्षीय युवा शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवन संपविले .सदरची घटना 12 ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान उघडकीस आली.
प्रज्वल मोहन बोढे वय 20 वर्ष, रा. आपटी असे मृतक युवा शेतकऱ्याचे नाव आहे. तो वरोरा येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत होता . वडिलांना अर्धांगवायू असल्याने तो शिक्षणासोबत वडिलोपार्जित सात एकर शेती करीत होता. अती पावसामुळे पिकाचे नुकसान झाल्याने त्याने पिक विमा कंपनीकडे तक्रार नोंदविली होती. त्या अनुषंगाने विमा कंपनी चे प्रतिनिधी पीक पाहणी करता येत असल्याने तो सकाळी गावाला आला होता. पिक विमा पिक विमा प्रतिनिधींनी पिकाचे पंचनामे केल्यानंतर तो घरी परत आला.
अशातच त्याने जुन्या राहत्या घरात जात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्रज्वल च्या आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट आहे. सदर घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.