Breaking News

मारेगाव चोरीचा छडा… एक चोरटा लागला मारेगाव पोलिसांच्या गळाला

– तेलंगणा राज्यातून घेतले ताब्यात

– पोलीस पथक कार्यान्वित : अनेक चोरटे रडारवर

मारेगाव : दीपक डोहणे

एक महिन्यांपूर्वी मारेगाव येथील तब्बल 17 घरांच्या घरफोडीने नागरिक प्रभावित अन दहशत निर्माण करणाऱ्या चोरीचा छडा लावण्यात मारेगाव पोलिसांना काहीसे यश प्राप्त झाले आहे.थेट तेलंगणा राज्यातून ‘फिंगर प्रिंट’ च्या आधारे एकास ताब्यात घेण्यात आले असून घटनेच्या खोलात जावून चोरीचा उलगडा होण्याची शक्यता बळावली आहे.पोलिसांच्या रडारवर यातील चोरटे आहे.

जिल्ह्यात खळबळ निर्माण करणाऱ्या पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशीच्या मध्यरात्री मारेगाव येथील माधव ,ओम व निर्मिती नगरीतील तब्बल 17 घरे चोरट्यांनी फोडून खळबळ माजविली होती.एकाच रात्री 17 घरफोडी ही घटना बहुदा जिल्ह्यातील पहिलीच असावी असा कयास ही वर्तविण्यात येत होता.मारेगाव पोलिसांनी तपासाचे चक्रे गतिमान करून इतर राज्यात पथक कार्यान्वित केले आहे.

परिणामी , घटनेच्या दिवसाला स्कॉट डॉग सह ठसे तज्ज्ञ यांना पाचारण करण्यात आले.घटनास्थळी ‘कँडी’ ही घुटमळत राहिली मात्र फिंगरप्रिंट चा आधार तज्ज्ञांना लागला.त्या दिशेने पोलिसांनी तपासाची चक्रे चहुबाजूंनी फिरविली.

दरम्यान , तेलंगणा राज्यातील आसिमाबाद येथील दोन दिवसांपूर्वी एका घरी चार चोरट्यांनी डल्ला मारला.येथील नागरीकांच्या सतर्कतेने एकास पकडण्यात यश मिळविले तर यातील तिघे पसार होण्यास यशस्वी झाले.आसिमाबाद पोलिसांकडून फिंगरप्रिंट च्या आधारे प्रकाश शेट्टी उर्फ रमेश राजा मलकीन (चेन्नई ) यास मारेगाव पोलिसांनी अटक करून पाच दिवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली. या चोरट्याकडून चोरीचे अनेक पैलू बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तेलंगणा राज्यात उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश केंद्रे यांच्या विशेष मार्गदर्शनात ठाणेदार खंडेराव यांचे पुढाकारात जमादार आनंद अलचेवार , दीपक गावंडे , प्रमोद जिड्डेवार यांनी ही मोहीम पार पाडली. उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सावंत यांचे नेतृत्वातील पोलीस पथक मागील सात दिवसापासून चेन्नई येथे चोरट्यांचा छडा लावण्यात मोहीम फत्ते करीत आहे.

 

घरफोडी घटनेचे चोरटे किती गळाला लागतात याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले असून अनेकांचे लाखो रुपयांचे आभूषणे व रोख रक्कम मिळण्याची आस पिडितांना लागली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment