– मनसे शहराध्यक्ष चांद बहादे सह कार्यकर्त्यांनी दिला सज्जड दम
-तहसीलदार मार्फत वरिष्ठांकडे तक्रार
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
तालुक्यातील बहुतांश गावात बोगस डॉक्टरांनी जाळे विणले आहे.वाजवीपेक्षा अधिकचा डोस अन स्वतः जवळील औषधीच्या खपाने रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न स्थानिक प्रशासनाकडून बेदखल होत असतांना त्यांच्यावर कारवाईचा तात्काळ बडगा उगारा अन्यथा आम्हीच बोगस दवाखान्याला टाळे लावून त्यांची शस्रक्रिया करू असा सज्जड दम तहसीलदार मार्फत वरिष्ठांना दिलेल्या निवेदनातून मनसे शहर अध्यक्ष चांद बहादे सह कार्यकर्त्यांनी दिला आहे.
शंभराहून अधिक गावे विस्तारलेल्या मारेगाव तालुक्यातील बहुतांश ग्रामीण भागात व शहरात बंगाली डॉक्टरांनी पाय पसरले आहे.साधी सलाईन देण्याची डॉक्टरांना मुभा नसतांना त्यांची मजल शास्त्रक्रियेपर्यंत गेलेली आहे.नव्हेतर यापूर्वी गर्भधारणा व प्रसूती करण्यावरही या बोगस डॉक्टरांनी तज्ज्ञ असल्याचा आव रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सर्वश्रुत आहे.किंबहुना यांचेवर स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवेदनात केला आहे.त्यामुळेच बोगस डॉक्टरचा आकडा मारेगाव तालुक्यात वाढून त्यांचे चांगलेच फावत आहे.
मारेगाव तालुक्यातील शेती हा मुख्य व्यवसायाने जीवनाचे चाके ढकलत जीवन कंठणाऱ्या तालुक्यात मजुरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.त्यामुळे आर्थिक स्रोत तोडक्या स्वरूपाचे असतांना रुग्णावर उपचार करणारे हे बोगस डॉक्टर नको ते उपचार करून शारीरिक व आर्थिकदृष्ट्या खाईत लोटण्याचा गोरखधंदा फुगत आहे.यावर अंकुश लावण्यात येथील प्रशासन सपशेल अपयशी ठरत असल्याचाही आरोप निवेदनातून करण्यात आला.
मारेगाव आरोग्य यंत्रणेने या बोगस डॉक्टरांची तात्काळ उपचार करावा अन्यथा आम्हास कायमस्वरूपी शस्रक्रिया करून त्यांच्या दवाखान्याला टाळे ठोकून उपचार करु असा सज्जड दम शहर अध्यक्ष चांद बहादे यांचेसह अनिल गेडाम , विलास रायपूरे , गजानन चंदनखेडे , नबी शेख , आकाश खामनकर , जमीर सय्यद , ईशान दारुंडे यांनी तहसीलदार यांचे मार्फत वरिष्ठांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
प्रशासनाकडून वारंवार कारवाईचे शस्र उगारल्या गेले आहे.बोगस डॉक्टरांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेवून यापूर्वी पासूनच कारवाईचा ससेमिरा कायम आहे.मात्र मनसे कडून आजतागायत तक्रार प्राप्त नाही. तक्रार येताच कारवाईची कडक अंमलबजावणी करू
डॉ. अर्चना देठे
तालुका वैद्यकीय अधिकारी , मारेगाव