Breaking News

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उद्या एक दिवसीय धरणे आंदोलन

 

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

धनगर समाजाच्या आरक्षणाकरिता तालुका धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने उद्या दिनांक पाच ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान तहसील कार्यालय येथे धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी धनगर समाजाला एसटी आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी व तसा शासकीय अध्यादेश काढून समाजाला एसटी प्रमाणपत्रे वितरण करण्यात यावे , धनगर मेंढपाळ यांना चराईसाठी क्षेत्र उपलब्ध करून देण्यात यावे, शेळी मेंढीचा एक रुपयात विमा काढून देण्यात यावा, धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची, अभ्यासिकेची व निवासाची व्यवस्था मोफत करण्यात यावी. पुणे येथील महामंडळाच्या प्रस्थापित जागेवर निवासाचे बांधकाम करण्यात यावे आदी मागण्या यावेळी करण्यात येणार आहे.

तरी या धरणे आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा.संजय लव्हाळे, माणिक पांगुळ, अरविंद वखनोर ,अतुल बोबडे, प्रफुल झाडे ,राजू आस्कर, राज बोबडे ,आशिष खंडाळकर संजय काळे ,गंगाबाई करडे ,शोभा कालर आदींनी केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment