Breaking News

मारेगावच्या महाविद्यालयाचे NAAC बेंगलोर कडून मूल्यांकन

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

स्थानिक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगांव येथे दिनांक 26 व 27 सप्टेंबर 2023 रोजी NAAC बंगलोरकडून आलेल्या कमिटी मार्फत मूल्यांकन करण्यात आले.

दोन दिवसीय मुल्यांकन प्रक्रियेमध्ये सदर कमिटीने माजी विद्यार्थी ,पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक व विद्यापीठ प्रतिनिधी सोबत चर्चा केली. समारोपीय कार्यक्रमात कमिटी द्वारे महाविद्यालयाचा परिसर, महाविद्यालयाची ईमारत व भौतिकसुविधे बाबत प्रशंसनिय उद्गार अधोरेखित केले. तसेच सन्माननीय प्राचार्य डॉ. अविनाश घरडे यांचे कार्य अतिउत्तम आणि मागील पाच वर्षाचे सादरीकरण अप्रतिम आणि दर्जेदार शेरा अग्रेषित केलाय.

महाविद्यालयाच्या इंटर्नल क्वालिटी असुरन्स सेल चे समन्वयक डॉ. एन. आर. पवार यांचेसह सर्वच डिपार्टमेंटचे सादरीकर दर्जात्मक होते असे गौरोउद्गाराचा उल्लेख कमिटीकडून करण्यात आला.


व्यवस्थापक मंडळाकडून महाविद्यालयाला अप्रतिम वास्तू उपलब्ध करून दिली असाही उल्लेख करण्यात आला.
सर्व सोयीने परिपुर्ण महाविद्यालय असा ग्रीन सिग्नल दिला.
NAAC बेंगलोर कडून 2016 मध्ये झालेल्या मूल्यांकनामध्ये सुद्धा उत्कृष्ट दर्जा प्राप्त झाला होता. तसाच आताही उत्कृष्ट दर्जा प्राप्त होईल असा आशावाद संस्थेचे अध्यक्ष मा. श्री जीवन पा. कापसे व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. अविनाश घरडे यांनी व्यक्त केला. मूल्यांकनामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ.एन. आर. पवार, आय. क्यू. ए. सी. सल्लागार डॉ. दिनेश गुंडावार, आय. क्यू. ए. सी. कमिटी चे सर्व सभासद, महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदांनी अथक परिश्रम घेतले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment