Breaking News

संवेदना… मार्डीचे उपसरपंच सुधाकर डाहुले यांचे निधन

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

तालुक्यातील मार्डी येथील उपसरपंच सुधाकर महादेवराव डाहुले (65) यांचे अल्पशा आजाराने चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या अकाली मृत्यूने सामाजिक तथा राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

सुधाकरराव डाहुले हे मार्डी येथील ग्रामपंचायत चे विद्यमान उपसरपंच होते.मागील चार दिवसांपूर्वी त्यांना तापाने ग्रासले होते.त्यांनी विहीत वेळेत डॉक्टरचा सल्ला न घेतल्याने आजार बळावला.त्यांना चंद्रपूर दवाखान्यात हलविण्यात आले. डेंगू सदृश्य आजार असल्याचे डॉक्टरांनी नमूद केले. आणि अल्पशा आजाराने त्यांचा आज पहाटे 5 वाजता मृत्यू झाला.

डाहुले यांच्या पश्चात वडील , पत्नी , एक मुलगा तीन मुली असा आप्तपरीवार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment