– कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह , माधव नगरीतील नागरिक उपसणार उपोषणाचे हत्यार
– पोलिसात निवेदन
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे मारेगाव येथील माधव , ओम आणि निर्मिती नगर मध्ये तब्बल 17 घरातील घरफोडीत लाखोंचा ऐवज व रोख रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला.मात्र आजतागायत चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले नसल्याने कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उठवित येथील नागरिकांनी आता उपोषणाच्या माध्यमातून न्याय मागण्याचे हत्यार उपसण्याची व्युव्हरचना आखली आहे.
जिल्ह्यातील बहुदा पहिल्यांदाच मारेगाव येथील जम्बो घरफोडीने नागरिक प्रभावित होत दहशतीत आहे.तब्बल 17 घरातील घरफोडीत अनेकांचे सोन्याचे अलंकार सह रोख रक्कम लाखो रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला होता.
चोरी प्रकरणाचा तपास थंडबस्त्यात असल्याचा आरोप करीत चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अजूनही यश आले नाही.किंबहुना रात्रीची गस्त वाढविण्याची तसदी सुद्धा घेण्यात आली नसल्याने येथील नागरिकात नाराजीचा सूर आहे.
दरम्यान ,पोलीस प्रशासनाकडून घटनेच्या दिवसाला स्कॉट डॉग ला पाचारण करण्यात आले मात्र हा ‘कँडी’ जागेवरच घुटमळत राहिला.ठसे तज्ज्ञही घटनास्थळी येवून गेले यात काहीसा कानोसा मिळाल्याची माहिती आहे.
परिणामी ,चोरट्यांना तात्काळ जेरबंद करून मुद्देमाल परत करावा अशी आर्जव मागणी करीत येथील नागरिकांनी वरिष्ठांना निवेदन दिले.मारेगाव पोलिसात दिलेल्या निवेदनवेळी हेमराज कळंबे , विजय झाडे , सुरेश आत्राम , मंगेश गवळी , सुंदरलाल आत्राम , संतोष ठाकरे , सुनंदा कोळेकर , बाळू काकडे , सुनील भोयर , राजू डवरे , प्रविण बदकी , चंद्रशेखर बोकडे , दीपक उरकुडे , गणेश कनाके , रमेश बोंडे यांचेसह बहुसंख्य नगरीतील पुरुष व महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.