– मारेगाव तालुका भाकपचा एल्गार
– प्रवासी शेड चोरी प्रकरण पेटणार
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
मारेगावात नविन बसथांबा तयार झाला.त्या शेजारी प्रवाशांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने तात्पुरत्या स्वरूपाचा प्रवासी निवारा उभा केला.मात्र हा निवाराच गौरीशंकर खुराणा यांनी आता चोरल्याची तक्रार पक्षातर्फे पोलिसात करण्यात आली.मात्र ठाणेदार उलट खुराणा यांची पाठराखण करीत असल्याचा आरोप आहे. यामुळे आता ठाणेदार हटाव साठी भाकप ने एल्गार पुकारला आहे.आज उग्र स्वरूपात जेलभरो आंदोलन नेमका कोणते वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मारेगाव शहरात बसथांबाची मोठी बोंब आहे. राजकीय तमाशाने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. अनेक वर्षांपासून भारतीय कम्युनिस्ट पक्ष सातत्याने आंदोलन करून बसस्थानक व्हावे यासाठी लढत आहे. यामुळे बसथांबा नविन जागी तयार झाला.पण राजकीय पोलिओ झालेल्या अनेक नेत्यांनी मारेगावकरांच्या हाती झुंनझुनेच दिले आहे. नव्या बसथांबा जागेवर प्रवाशांना मूलभूत सोयी निर्माण करण्यात प्रशासन व महामंडळ सपशेल नापास झाले. त्यामुळे प्रवाशांची खूप गैरसोय होत आहे.
प्रवाशांच्या गैरसोयीची गंभीरता लक्षात घेऊन राज्य महामार्गाच्या कडेला भाकप ने तात्पुरता प्रवासी निवारा उभारला होता. मात्र हा प्रवासी निवारा चोरी केल्याचा आरोप गौरीशंकर खुराणा यांचेवर आहे. या शेड वरील पक्षाचे नाव, चिन्ह असलेला बॅनर फाडून आणि शेड मोडतोड करून चोरी केल्याने भाकप तर्फे पोलिसात तक्रार करण्यात आली. मात्र ठाणेदार तर्फे हे गंभीर प्रकरण बेदखल करण्यात आल्याने भाकप ने आता खुराणा यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. काल मार्डी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. पक्षातर्फे आज जेलभरो चे आंदोलन आहे.
शेड चोरी करण्याचा आरोप गौरी खुराणा वर आहे. पण चोरांना पाठीशी घालून अभय देणाऱ्या ठाणेदार यांचीच आता उचलबांगडी करण्यासाठी आज आक्रमक जेलभरो आंदोलन छेडण्यात येणार आहे.हे आंदोलन नेमके कोणते वळण घेतात याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.याबाबतचे निवेदन वरिष्ठांकडे पाठविण्यात आले असून निवेदनावर कॉ. अनिल हेपट , कॉ. अनिल घाटे , कॉ. श्रीकांत तांबेकर , कॉ. वासुदेव गोहणे , कॉ. बंडू गोलर , कॉ. लता रामटेके , कॉ. रंजना टेकम , कॉ. धनराज अडबाले , कॉ. प्रफुल्ल आदे , यांचेसह दत्तू कोहळे , दत्तू आडे , इरफान शेख सह तालुक्यातील भाकप च्या पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहे.
या संदर्भात मारेगाव ठाणेदार खंडेराव यांचेशी सातत्याने संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होवू शकला नाही