Breaking News

गौराळा अपघात अपडेट… टिप्परला दिशादर्शक संकेत नसल्यानेच ट्रॅव्हल्सची धडक

– जिवीतहानी टळली : जखमीचा आकडा फुगला
– अकोला जिल्ह्यातील भाविक जात होते रामदिघीला

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

टिप्परचा टायर फुटल्याने राज्य महामार्गावर उभा असलेला टिप्परला कोणतेही दिशादर्शक संकेत नसल्याने किर्रर्र अंधारात ट्रॅव्हल्सचा गुरुवारला रात्री 9 वाजताचे दरम्यान अपघात झाला.अपघातात सुदैवाने जिवीतहानी झाली नसली तरी जखमींचा आकडा फुगून 36 वर गेला.मारेगाव येथील प्राथमिक उपचारानंतर जखमींना चंद्रपूर – यवतमाळ व वणी येथे दाखल करण्यात आले.परिणामी धोकादायक स्थितीत वाहन उभे ठेवल्याने टिप्पर चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा व आकोली येथील एकूण 49 अनुयायी ट्रॅव्हल्स भाड्याने करून चिमूर तालुक्यातील रामदिघी येथील विपश्यना बुद्ध विहारात प्रवचनाला जात होते. मारेगाव वणी राज्यमहामार्गावर असलेल्या गौराळा फाट्यासमोर टिप्पर क्रं. MH 33 W 9909 चा टायर फुटल्याने बंद अवस्थेत उभा होता.मात्र या टिप्परला कोणतेही इंडिकेटर , रिफ्लेक्टर अथवा रेडीयमचे दिशादर्शक संकेत नसल्याने रात्रीच्या काळोखात भाविकांना घेवून मागावून येत असलेल्या ट्रॅव्हल्स चालकास टिप्पर दिसेनासा झाल्याने धडक बसली.यात एकूण 49 भविकांपैकी 36 जन जखमी झाले.यात किमान सात जनावर गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या असून सुदैवाने जिवीतहानी टळली.ट्रॅव्हल्स चालकाच्या बाजूला बसलेल्या महिला या धडकेत दबल्या गेल्याने तिला काढण्यास तब्बल दीड तास शर्तीच्या प्रयत्नात यश आले.यातील जखमींना पुढील उपचारार्थ चंद्रपूर , वणी , यवतमाळ येथे दाखल करण्यात आले आहे.

अपघात दरम्यान सुरक्षित महिला व बालकांची कालवाकालव वेदनादायी होती.त्यांना मारेगाव येथे आणून मानवी मनाची झालर पांघरण्यात आली आणि मध्यरात्री यवतमाळ रवाना करण्यात आले. तोवर अकोला येथील नातेवाईकांनी यवतमाळ कडे कूच केले होते.

अपघातस्थळी रात्रीच्या सुमारास मारेगाव ,गौराळा , मांगरुळ येथील युवकांनी मदत व सहकार्याची भूमिका मानवतेचे दर्शन घडविण्यासाठी अधोरेखित ठरली.परिणामी वाहतूक नियमाचे उल्लंघन करीत धोकादायक स्थितीत वाहन उभे ठेवण्याचे टिप्पर चालक यांचेवर कलम 283 , 337 , 338 कलमान्वये मारेगाव पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान , राज्य महामार्गावर अनेक वाहने संकेत नसलेल्या स्थितीत उभे असणे नविन नाही. त्याचा कानोसा घेण्यात येथील अनियंत्रित असलेले प्रशासन सपशेल अपयशी ठरत असल्यानेच अपघाताची शक्यता बळावण्यास पुरेशी ठरत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment