Breaking News

भीषण अपघात.. उभ्या टिप्परला ट्रॅव्हल्सची धडक

– गौराळा फाट्यानजीकची घटना
– 25 प्रवासी जखमी चा अंदाज
– महिला प्रवासी कॅबिनमध्ये फसलेले : काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न

मारेगाव : दीपक डोहणे

वणी मारेगाव राज्य महामार्गावर उभ्या असलेल्या टिप्परला मागावून आलेल्या हमसफर ट्रॅव्हल्सने जबर धडक दिल्याने जवळपास 25 प्रवासी जखमी झाल्याची घटना गौराळा फाट्यानजीक रात्री 9 वाजताचे दरम्यान घडली.

गौराळा रस्त्याच्या कडेला टिप्पर क्रमांक MH 34 W9909 उभा असतांना अकोला येथून चिमूर कडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स क्रमांक MH 27 A 9994 ने जबर धडक दिली.ट्रॅव्हल्स मध्ये जवळपास 50 प्रवासी असतांना यातील 25 प्रवासी जखमी झाले.ट्रॅव्हल्स कॅबिनमध्ये एक महिला फसलेल्या आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे.जखमींना मारेगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.अनेक प्रवासी थोडक्यात बचावले असून जवळपास प्रवासी सुखरूप आहे.

ट्रॅव्हल्स ही अकोला येथील असून यातील प्रवासी व भाविक हे तेल्हारा , आकोली येथून ट्रॅव्हल्स भाड्याने करून चिमूर येथे दर्शनासाठी जात होते.सुदैवाने जीवितहानी टळली असून दुतर्फा वाहतूक प्रभावित झाली आहे.घटनास्थळी डॉक्टर व वणी मारेगाव पोलीस पथक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment