Breaking News

मोहम्मद पैगंबर जयंती…मारेगावात ईद ए मिलादुन्नबी उत्साहात

– शहराच्या मुख्य रस्त्याने भव्य मिरवणूक , पताका , फटाक्याची आतषबाजी , गायन व जयघोषाने अभिवादन

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

मारेगाव शहरात ईद ए मिलादुन्नबी अर्थात मोहम्मद पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

ईद पर्वावर मागील आठवड्यापासून मस्जिद कडे जाणाऱ्या आंबेडकर चौकातील मुख्य रस्त्यावर देखणा प्रवेशद्वार , मस्जिद पर्यंतची रोषणाई व मस्जिदवर पांघरलेली सुशोभित रंगीबेरंगी झगमगाट लायटिंग मोहम्मद पैगंबर जयंती उत्सव पर्व धार्मिक उत्सवाचा परिपाक ठरला.

जयंती उत्सवानिमित्त गौसिया मस्जिद पासून सकाळी भव्य मिरवणूक काढण्यात येवून शहराच्या मुख्य रस्त्याने पादाक्रांत करीत फटाक्यांची आतषबाजी , गायन व जयघोषाने परिसर दुमदुमला.मिरवणुकीची सांगता नमाज पठणाने करण्यात आली.

दरम्यान , इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद ए मिलादुन्नबी म्हणून साजरी केली जाते. मोहम्मद पैगंबर हे अल्लाहचे अंतिम प्रेषित होते.इस्लामच्या धोरणेंनुसार अल्लाहने त्यांच्यामार्फत ‘कुराण’ हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहचवला. त्यामुळेच त्यांना नबी , रसूल नावानेही संबोधले जाते.इस्लाम मध्ये ईद ए मिलादुन्नबी हा सर्वात मोठा दिवस मानल्या जाते.मारेगाव शहरात हा जयंती उत्सव दरवर्षाला वैशिष्ट्यपूर्ण आणि धार्मिक सामंजस्याचे प्रतीक ठरते.

जयंती उत्सवात याप्रसंगी समाजबांधवांनी उपस्थिती लक्षणीय होती.जयंती उत्सव पार पाडण्यासाठी जुबेर पटेल , शेख शाहरुख , सैलानी खान ,फरीद शेख , शेख महेबूब , शेख शाकीर आतिफ शेख , शहाबाज शेख , शेख निसार , सोनू शेख , जुनेद पटेल , मदार कुरेशी , ऐफाज काजी , रॉयल सय्यद , आसिफ शेख , आसिफ सत्तार शेख , आरिफ सय्यद , नवाजीश कुरेशी आदींनी पुढाकार घेतला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment