Breaking News

मारेगाव बसथांबा जागेत बदल

– नियोजित बसस्थानक परिसरात प्रवाशांची तोबा गर्दी

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

मारेगाव बसस्थानकाचा प्रश्न मार्गी लागण्याचे संकेत असतांना नियोजित जागेवर आज रविवार पासून बस चा थांबा सुरू करण्यात आला आहे.

मारेगाव तालुका वेगवेगळ्या समस्येच्या गर्तेत असतांना बसस्थानक ही एक समस्या ऐरणीवर होती.यासाठी अनेक सामाजिक , राजकीय संघटनांनी आंदोलन उभारून लोकप्रतिनिधी सह प्रशासनाचे लक्ष वेधले होते.किंबहुना येणाऱ्या स्वातंत्र्य दिनी शासनास मुहूर्त सापडला नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा गर्भित इशारा देण्यात आला.

परिणामी , ऐन रस्त्यावर बस चा थांबा असल्याने ही प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आता सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्य महामार्गाचे बाजूला खुली जागा आजपासून बस थांबण्यासाठी खुली करून तसे नियोजन करण्यात आले आहे.

वेगवेगळ्या जिल्ह्यातील बस या ठिकाणी येऊन प्रवाशांची आता बदल झालेल्या जागेवर तोबा गर्दी दिसत आहे.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ वणी आगाराचे वाहतूक नियंत्रक प्रकाश पेंदोर नविन जागेवरील ये जा करणाऱ्या बस ची नोंद करीत आहे.

बस थांबा जागेचा बदल झाला असला तरी प्रवाशांना तूर्तास उन्हाचे चटके सोसावे लागत आहे.दरम्यान बस स्थानक उभारण्याची अनिश्चितता कायम आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment