प्रांत:विधिला जातांना ‘ती’ च्यावर साधला कुकर्माचा डाव
विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव
अल्पवयीन युवती प्रांत:विधीला जातांना मारेगाव तालुक्यातील कोलगाव येथील युवकाने ‘ती’ च्यावर कुकर्म केल्याची घटना १२ मार्च ला घडली.या प्रकरणी युवकावर वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करून गजाआड करण्यात आले.
संदीप परशुराम धुर्वे (२५) असे अटकेत असलेल्या युवकाचे नाव आहे.रविवारी रात्रीच्या सुमारास अल्पवयीन युवती प्रांत:विधीला घराबाहेर पडली.बराच अवधी झाल्यागतही घरी परतली नसल्याने वडिलांनी भ्रमणध्वनी वर संपर्क केला मात्र तो बंद दाखवित असल्याने ती चा शोध घेण्यात आला.
बऱ्याच अवधी नंतर घरी परतल्याने घडलेला कुकर्माचा प्रकार घरी कथन केला.कुटुंब प्रमुखाच्या फिर्यादीवरून संशायित आरोपी संदीप धुर्वे याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कलम ३७६ , ३७६(१)(A) , ३७६(२)(N) नुसार गुन्हा दाखल करून मारेगाव पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली.