◆ कला – वाणिज्य , विज्ञान महाविद्यालयाचा पुढाकार
विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागा तर्फे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
व्याख्यानाकरीता प्रा. डॉ. उमेश मोरे, सहा. प्रा.भारती महाविद्यालय, आर्णी यांना पाचारण करण्यात आले होते. सरांनी *Protein Synthesis* या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला
प्रा. डॉ. अशोक यावले अध्यक्ष म्हणून तर प्रमुख अतिथी डॉ. उमेश मोरे उपस्थित होते.
महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. कुळकर्णी, डॉ. केलोडे, डॉ. तानुरकर, डॉ. घोडखंदे, प्रा. देशमुख, डॉ. चिरडे, डॉ. राऊत, प्रा. कांबळे, प्रा. जेणेकर, प्रा. आत्राम, प्रा. वांढरे, डॉ. कांबळे व श्री. अभिजित पंढरपूरे आदींची यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी प्रा. भांदक्कर, प्रा. माकडे व प्रा. डॉ. अडसरे यांनी पुढाकार घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनस्पती विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.विनोद चव्हाण ,सुत्रसंचालन कु. ऋतुजा ठावरी तर आभार कु.वैष्णवी राजूरकर यांनी मानले.