◆ नियमांची पायमल्ली करीत अंधाऱ्या वाटेतील उभी वाहने ठरताहेत जीवघेणे
◆ मृतक हरिदासचा अवघ्या दिवसात होणार होता साक्षगंध
विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव
दोघेही सख्खे चुलत भाऊ.शेती त्यांचा मुख्य व्यवसाय.सालईपोड येथून गुरुवारला दिवसभर शेतीचे कामे आटोपून खासगी कामांकरिता सायंकाळी मारेगावकडे दुचाकीने स्वार झाले अन अघटीत घडले.नादुरुस्त उभा ट्रकला कोणतीही दिशादर्शक संकेत नसल्याने दोन भावडांची दुचाकी मागावून गुरुवारच्या रात्रीला धडकली.यात एक भाऊ जागीच ठार झाला तर दुसऱ्याचा उपचारार्थ नेत असतांना वाटेतच मृत्यू झाला.
राज्य महामार्गावर दोन दिवसांपूर्वी एम.एच.३४ ए. व्ही.३८५९ कोळशाचा ट्रक पलटी झाला.त्याला उभा करीत कोणतेही दिशादर्शक संकेत नसताना काळोखात हा ट्रक दोन भावा साठी काळ ठरला.
मारेगाव तालुक्यातील सालईपोड येथील मोठ्या वडिलाचा मुलगा किसन लखमा टेकाम (४१)व हरिदास लक्ष्मण टेकाम (२९)हे दोघे भाऊ खासगी कामानिमित्त दुचाकीने मारेगावला निघालेत.खडकी फाट्यानजीक अपघातग्रस्त ट्रक मार्गावरील नियम धाब्यावर ठेवून उभा असतांना गुरुवारी रात्री ८ वाजताचे दरम्यान ट्रकवर दुचाकी आदळली.यात अवघ्या दिवसावर साक्षगंध असलेल्या हरिदासचा जागीच करून अंत झाला.त्याच्या पश्चात आई वडील, भाऊ , बहिणी असा आप्तपरिवार आहे.
गंभीररित्या जखमी झालेला मोठ्या वडिलाचा मुलगा किसन लखमा टेकाम याचा पुढील उपचार्थ चंद्रपूर येथे नेत असतांना वाटेतच मृत्यू झाला.किसन याच्या मागे आई – वडील , पत्नी व दोन कोवळी मुले आहेत.टेकाम कुटुंबात हरिदासचे लग्न जुळलेल्या सोहळ्याची तयारी सुरू असतांना आनंदावर विरजण पडले.या घटनेने सालईपोड परिसरात पुरती शोककळा पसरली आहे.
परिणामी , राज्यमहामार्गावर रात्रीला कोणतेही दिशादर्शक संकेत नसलेले वाहने उभे ठेवून काटेकोर नियमांची पायमल्ली ही सर्वश्रुत असतांना छोट्या वाहनधारकासाठी हे उभे ट्रक काळ ठरत आहे.