– पांढरकवडा सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
मारेगाव तालुक्यातील मार्डी येथील भर चौकात कुऱ्हाडीने वार करून एकाचा खून केला होता. सदरील प्रकरण न्यायप्रविष्ठ होवून आज पांढरकवडा सत्र न्यायालयाने निकाल देत आरोपीस दहा हजार रु. च्या दंडासह जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
तालुक्यातील मार्डी येथे 9 आँगष्ठ 2023 रोजी रात्री आठ वाजताचे दरम्यान आरोपी प्रदीप उर्फ काळ्या गोविंदराव भालशंकर (38) रा. मार्डी याने भर चौकात कैलास बंडू सलाम यास कुऱ्हाडीने डोके, गळा, छाती व शरीराच्या इतर भागात गंभीर स्वरूपाचे वार करून जागीच ठार केल्याने एकच खळबळ उडाली होती.
फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपीस तात्काळ अटक केल्यानंतर प्रकरण पांढरकवडा सत्र न्यायालयात न्यायप्रविष्ठ झाले.सदरील प्रकरणात सरकारी अभियोक्ता रमेश देविदास मोरे यांनी सरकारतर्फे आठ साक्षीदार तपासले.यात प्रत्यक्षदर्शी तिघांची साक्ष महत्वाची ठरली.
अभियोजन पक्षातर्फे केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून वि. सत्र न्यायालयाने आरोपी प्रदीप भालशंकर यास दहा हजार रु. च्या दंडासह जन्मठेपेची शिक्षा सुनावली.