सावधान.. शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसणार खेडा खरेदीच भूत 

 

– व्यापारी सज्ज : शेतकऱ्यांची होणार आर्थिक पिळवणूक

मारेगाव : संतोष रोगे

अस्मानी सुलतानी पुरता बेजार झालेल्या शेतकऱ्यांच्या मानगुटीवर आता खेडा खरेदी व्यापारी बसण्यासाठी चहू बाजूनी सज्ज झाला आहे. अवघ्या दिवसातच ग्रामीण भागात भल्या पहाटेपासून घिरट्या घालणारे व्यापारी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करणार आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष केंद्रीत करून पायबंद घालण्याची मागणी जोर धरत आहे.

 

बेताल वागणाऱ्या निसर्गावर येथील शेती हा मुख्य व्यवसाय असतांना यंदाही कोरडा दुष्काळाने कमालीची आर्थिक विवंचना शेतकऱ्यांच्या नशिबी आहे.अत्यल्प पावसाच्या लपंडावाने पुरेशा सोयाबीन व कापूस या मुख्य उत्पादणाला प्रचंड घट निर्माण झाल्याने बळीराजा कमालीचा वैतागून आहे.

 

दरम्यान, कापूस सोयाबीन निघण्याचा हंगाम तोंडावर असतांना त्यास कवडीमोल भावात गिळ्कृत करण्याचा घाट व्यापाऱ्यांकडून दरवर्षीप्रमाणे रचल्या जात आहे. आधीच अत्यल्प उत्पादन त्यातच खेडा खरेदीच्या भस्मासुराने कृषीप्रधान देशाच्या पोशिंद्याची पुरती आर्थिक पिळवणूक व्यापाऱ्यांच्या एजेंड्यावर आहे. यावर लगाम लावून शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी काही राजकीय पक्ष तसदी घेवून ग्रामीण भागात घिरट्या घालणाऱ्या व्यापाऱ्यांना पोलिसात जमा करण्याची व्यूव्हरचना आखत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment