– माकडाचा मृत्यू
– पती पत्नीसह बालीका जखमी
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
दोन वर्षाच्या मुलीला घेवून आईवडील मोटारसायकलने जात असतांना झाडावर उड्या मारणाऱ्या माकडाने अचानक धावत्या दुचाकीवर उडी घेतल्याने तिघे गंभीररित्या जखमी झाले तर माकडाचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना मारेगाव तालुक्यातील कुंभा महादापेठ रस्त्यालगत दि. 5 ला रात्री 7 वाजताचे दरम्यान घडली.
प्राप्त माहितीनुसार, बोटोणी येथील अक्षय उईके हे पत्नी सपना व दोन वर्षाची कुहू मुलीसह सासर असलेल्या माढेळी येथून दुचाकीने परतीचा प्रवास करीत होते. अचानक झाडावर उड्या मारणाऱ्या माकडाने धावत्या दुचाकीवर उडी घेतली यात दुचाकीवरील तिघेही खाली कोसळून गंभीररित्या जखमी झाले तर माकडालाही जबर मार लागल्याने घटनास्थळी माकडाचा मृत्यू झाला.
परिणामी, जखमींना तातडीने वणी येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी ‘विदर्भ टाईम्स’ ला दिली.