मनसेत शेकडोंचा जमघट.. अर्जुनी-केगांव येथील युवक,महिलांच्या हातात रेल्वेइंजिन

 

राजू उंबरकर / संतोष रोगे यांच्या संघटन कौशल्यावर फुंकर 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

आगामी काळात होणाऱ्या संभाव्य निवडणुकीच्या परिपाकाची नांदी आणि पक्षसंघटन म्हणून मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर व जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मारेगाव तालुक्यातील अर्जुनी आणि केगांव येथील शेकडो युवक व महिलांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करीत पक्षसंघटनेला बळ दिले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनाकडून ग्रामीण भागातील जनसामान्य लोंकांच्या संवेदनशील प्रश्नावर पोटतीडकीने अंमल करण्यासाठी सदैव अग्रेसर असल्याने किंबहुना राजू उंबरकर यांचे कणखर नेतृत्व त्यातच शेतकरी, बेरोजगार युवक, आरोग्य, अन्याय सारख्या प्रश्नावर फुंकर घालण्याच्या सातत्याने विभागात राजू उंबरकर यांनी आशावादी नेतृत्वाची कमान अधोरेखित केली आहे . याचाच पायंडा रोवत संघटन कौशल्यात अग्रणी असलेले संतोष रोगे यांचा तालुक्यातील दांडगा जनसंपर्क व कार्यशैलीवर विश्वास ठेवून तालुक्यातील जनतेची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पसंती दर्शवित अर्जुनी आणि केगांव येथील शेकडोनीं मनसेत जाहीर प्रवेश केला आहे.

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तालुक्यातील बहुतांश गावात पक्षप्रवेश तयारी जोर पकडत असतांना आगामी काळातील मनसे प्रस्थापितांचा बालेकिल्ला उध्वस्त करण्याच्या मागावर आहे.पक्ष प्रवेश सोहळ्यात राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर, जिल्हाउपाध्यक्ष संतोष रोगे, तालुकाध्यक्ष रुपेश ढोके, उदय खीरटकर, शहर अध्यक्ष चांद बहादे, आकाश खामणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment