– सर्पदंश झालेल्या महिलेस झाला होता खड्डेमय रस्त्याचा अडसर
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
गेल्या अनेक वर्षांपासून घोडदरा गावाकडे येजा करणाऱ्या रस्त्याची पूर्णतः वाट लागली असून शाळकरी विद्यार्थी सह नागरिक नाहक त्रासाला समोर जावे लागत आहे. त्यामुळे यावर कायमस्वरूपी इलाजासाठी आता मनसे रस्त्यावर उतरणार आहे.
राज्यमहामार्गा वरून तीन किमी अंतरावर असलेल्या घोडदरा गावाकडे जाण्यास रस्यावर नागरिकांना असह्य वेदना सहन कराव लागत आहे. खडकी पर्यंत उखडलेल्या रस्तानंतर मोठमोठे खड्डे पडले आहे त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. ऑटोरीक्षाने येजा करणाऱ्या विद्यार्थ्यांची या रस्त्याने सत्वपरीक्षा सुरु आहे. काही दिवसापूर्वी सर्पदंश झालेल्या महिलेला या वाटेचा अडथळा मृत्यूला कारणीभूत ठरला. खड्डेमय रस्त्यामुळे विहित वेळेत उपचार झाला असता तर कदाचित जीव गमाविण्याची वेळ महिलेस आली नसती असा संतप्त सवाल गावकरी करीत आहे.
रस्त्याच्या प्रमुख मागणीसाठी आता पुरे झाले म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रस्तारोको आंदोलन छेडण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.